Join us  

कोरोनामुळे कर्मचाऱ्यांनाही मिळावे सुरक्षा कवच; म्युनिसिपल मजदूर यूनियनची प्रशासनाकडे मागणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 9:09 PM

बहुउद्देशीय कामगारांना ५० लाख विमा उतरविण्यात यावा

मुंबई : पालिकेतील ऱोजंदारी, बहुउद्देशीय व कंत्राटी कामगाराना 50 लाख निधीचा विमा उतरविण्यात यावा, तसेच कोरोनाने निधन झालेल्या सर्व संवर्गातील कर्मचारी (रोजंदारी, बहुउद्देशीय, व कंत्राटी कामगारांसहित) सर्वांच्या पाल्याला शैक्षणिक अहर्यतेप्रमाणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल मजदूर यूनियनने केली आहे, याबाबत पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. तसेच पालिका प्रमुख रुग्णालयात देखील याबाबत लेखी पत्र व्यवहार करण्यात आला आहे.  मागील काही दिवसांपासून  मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची लागण झाल्याने नागरिक कोरोनाबाधित होत आहेतच, पण नागरिकांना सेवा देणारे पालिका कर्मचाऱ्याना देखील कोरोनाची लागण होत आहे. ज्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात काम करत असलेले कर्मचारी शिवाय इतर आस्थापनामधे कार्यरत कर्मचाऱ्यापैकी तब्बल 11 कर्मचाऱ्याचा कोरोना ने बळी घेतला आहे, शिवाय अनेक कर्मचारी क्वारंटाईन आहेत. याच पाश्वभूमीवर सोमवारी या मागणी बाबत तसेच कर्मचाऱ्याच्या विविध मागण्याकरीता  जाब विचारण्यासाठी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात चला डीनच्या कार्यालयात ही मोहिम सोमवारपासुन यूनियनने सुरु केली आहे.दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असताना देखील कर्मचाऱ्यांना पीपीई  किट, हॅण्डग्लोज, साबण, सॅनिटाइजर असे विविध साहित्य वेळेवर मिळत नसल्याचे ही बाब समोर आली आहे, याकडे ही प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी  करण्यात आली असल्याचे म्युनिसिपल मजदूर यूनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी सांगितले. तसेच कर्मचाऱ्याच्या आरोग्यकड़े प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप यूनियनने केला आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई