Join us

कोरोनामुळे दोन पोलिसांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे कांदिवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संभाजी नागरे (५४) आणि दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे कांदिवली पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संभाजी नागरे (५४) आणि दहिसर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार संदीप तावडे (४९) यांचा मृत्यू झाला.

मूळचे साताराचे रहिवासी असलेले नागरे यांना नुकतीच बढती मिळाली हाेती. काेराेना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर १६ एप्रिलला त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने चार दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचे निधन झाले, तर दहिसर पोलीस ठाण्यात न्यायालयीन कामकाज पाहणारे तावडे यांना २१ एप्रिलला दहिसर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केले होते. उपचारांदरम्यान तब्येत खालावल्याने २४ एप्रिलला सेव्हन हिल्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचारांदरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा त्यांचे निधन झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

* महिनाभरात १३ जणांनी गमावला जीव

आतापर्यंत मुंबईत पोलीस दलातील आतापर्यंत ८,७०० कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून, ११२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. तर १ एप्रिल २०२१ पासून १,०३४ कर्मचाऱ्यांना काेरोना झाला असून, ३८२ कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. गेल्या महिनाभरात १३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

................................