Join us  

कृत्रिम बुद्धीमतेचा वापर करुन ओळखणार कोरोनाचा संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 6:25 AM

ध्वनी लहरींची करणार चाचणी

मुंबई : रुग्णांच्या ध्वनी लहरींवरुन करोना संसर्ग झाल्याचे निदान होऊ शकते, यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयोग करण्यात येणार आहे. कूपर रुग्णालयात कृत्रिम बुद्धीमतेचा वापर करण्यात येणार आहे. गोरेगाव येथील नेस्कोच्या जम्बो केअर केंद्रातील संशयित आणि कोविड-१९ रूग्णांच्या आवाजाची तपासणी केली जाईल. या चाचणीमुळे अर्ध्या तासात त्या व्यक्तीच्या शरीरात विषाणू आहे की नाही याचे निदान होऊ शकेल. या चाचणीत पॉझिटिव्ह आढळतील त्यांचे आरटीपीसीआर चाचणीने त्यांचे पुन्हा निदान करण्यात येईल.अशी असेल चाचणीलक्षणे असणाऱ्या व्यक्तीस श्वासोच्छवासाची समस्या उद्भवू लागते. याचा फुप्फुसाच्या स्नायूंवरही परिणाम होऊन त्यांना सूज येते. त्याचा परिणाम आवाजावर होऊन बोलताना बदल जाणवू लागतो. बदललेल्या आवाजाला मोजण्यात येते आणि त्यातून त्या व्यक्तीला कोविड झाला आहे की नाही याचे निदान होते.  एक व्हॉईस अ‍ॅप्लिकेशन किंवा स्मार्ट लॅपटॉपवर घेऊन संशयित रुग्णाने त्या अ‍ॅप्लिकेशनवर काही नंबर बोलायचे. हे आवाजाचे नमुने मुख्य सर्व्हरसह स्वयंचलितपणे संकलित होतील. त्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ३० सेकंदात अहवाल मिळू शकतो.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई