नवी मुंबई : शहरातील जनता येथील सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला कंटाळली आहे. शहरवासीयांना आता बदल हवा आहे. स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी काँगे्रसला साथ द्या, असे आवाहन बेलापूर मतदार संघातील उमेदवार नामदेव भगत यांनी केले आहे. काँगे्रसच्यावतीने आज शहरात विविध ठिकाणी रॅलीचे आयोजन केले होते. चर्चमध्ये जावून तेथील फादरशीही संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले. शहरात प्रचारादरम्यान नामदेव भगत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. काँगे्रसने स्वच्छ व पारदर्शी कारभार केला असून भविष्यातही राज्याच्या हिताचे काम केले जाणार आहे. नवी मुंबईमध्येही महापालिकेमध्ये काँगे्रसच्या सदस्यांनी नेहमीच शहराच्या हितासाठी आवाज उठविला आहे. बेलापूर हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. तो पुन्हा मिळविण्यासाठी सर्व जुने व नवीन कार्यकर्ते एकदिलाने प्रयत्न आहेत. ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतली आहे. जनतेला बदल हवा असून तो काँगे्रस घडवून आणेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नेरूळ परिसरामध्ये ज्येष्ठ नगरसेवक संतोष शेट्टी यांनी रॅली काढून नागरिकांना काँगे्रसला मत देण्याचे आवाहन केले. शहरातील इतर ठिकाणीही प्रचार रॅलींचे आयोजन केले होते.
स्वच्छ कारभारासाठी साथ द्या
By admin | Updated: October 13, 2014 02:07 IST