मुंबई : ग्राहकाचे खाते नसलेल्या बँकेच्या एटीएमचा मर्यादित वापर सध्या ग्राहकाला करता येत असला तरी, त्याच्या बँकेच्या एटीएमप्रमाणो सर्व प्रकारचे व्यवहार करण्याची मुभा देण्याचा एक प्रस्ताव द नॅशलन पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने तयार केला आहे. हा प्रस्ताव रिझव्र्ह बँकेला सादर करण्यात आला असून, शिखर बँकेचा हिरवा कंदील मिळाल्यास यामुळे ग्राहकांना अधिक आकर्षक सुविधा मिळू शकतील. ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी एका शहरांत प्रायोगिक तत्त्वावरील अंमलबजावणीसाठी सर्व सज्जताही करण्यात आली आहे.
सध्या ज्या बँकेत ग्राहकाचे खाते नाही. परंतु त्याने अन्य बँकेच्या एटीएम मशीनचा त्याने वापर केला तर त्या ग्राहकाला पैसे काढणो, खात्यावरील बॅलेन्स तपासणो, शेवटच्या पाच ते सात व्यवहारांचा तपशील समजू शकेल, असे मिनिस्टेटमेंट मिळवणो इतकेच मर्यादित व्यवहार करता येतात. या तुलनेत ग्राहकाचे ज्या बँकेत खाते आहे, त्याच बँकेच्या एटीएमवर त्या ग्राहकाला पैसे काढणो, पैसे भरणो, नव्या चेकबुकसाठी विनंती देणो, कार्ड टू कार्ड पैसे ट्रान्स्फर करणो, एटीएम मशीनच्या साहाय्याने पैशांचे हस्तांतरण, बिल भरणा करणो आणि तत्सम सुविधा मिळू शकतात. थोडक्यात सांगायचे तर, ग्राहकाला अत्यंत मूलभूत पद्धतीच्या सर्व बँकिंग सुविधा एटीएम मशीनच्या माध्यमातून मिळू शकतात. परंतु ज्या बँकेत खाते नाही, अशी एटीएमवर वर नमूद केल्याप्रमाणो मर्यादित सुविधाच मिळतात. गेल्या काही वर्षात जसजसा एटीएम सेवेचा विस्तार होत आहे, त्या पाश्र्वभूमीवर एटीएमच्या खर्चातही वाढ होत आहे. विशेषत: बंगळुरूमध्ये किंवा अन्य एक दोन ठिकाणी एटीएम केंद्रात झालेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पाश्र्वभूमीवर शिखर बँकेने सर्व बँकांना एटीएममध्ये चोख सुरक्षेची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, अपंग अथवा अंध ग्राहकांची गैरसोय होऊ नये, याकरिता सर्वतोपरी साहाय्य करण्याचे निर्देश दिले. याचा परिणाम म्हणजे बँकांच्या एटीएम केंद्र चालविण्याच्या खर्चात वाढ होत आहे.
हा खर्च कमी करण्यासाठी नवनव्या संकल्पना बँकांतर्फे मांडल्या जात असून, खातेधारक नसलेल्या ग्राहकांना आपल्या एटीएमवरून सर्व सुविधा देणो ही संकल्पनादेखील याचाच एक भाग आहे. अर्थात, बँकांतर्फे अशी नवी संकल्पना मांडली जात असली तरी, शेवटी ही सुविधा ग्राहकांच्याच पथ्यावर पडणार आहे. (प्रतिनिधी)