Join us

मेट्रो-३ प्रकल्पाचा एलस्टॉमसोबत ट्रेन्ससाठी करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 02:31 IST

मुंबई मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड (एमएमआरसी) ने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गिकेच्या अत्याधुनिक रोलिंग स्टॉकच्या खरेदीसाठी आॅलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड आणि एलस्टॉम ट्रान्सपोर्ट एस.ए फ्रान्स यांच्यासोबत करार केला.

मुंबई : मुंबई मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड (एमएमआरसी) ने कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गिकेच्या अत्याधुनिक रोलिंग स्टॉकच्या खरेदीसाठी आॅलस्टॉम ट्रान्सपोर्ट इंडिया लिमिटेड आणि एलस्टॉम ट्रान्सपोर्ट एस.ए फ्रान्स यांच्यासोबत करार केला. संबंधित पूर्व-पात्र बोलीधारकांत सर्वोत्तम ठरल्याने, एलस्टॉम या कंपनीला १९ जुलै रोजी कार्यादेश देण्यात आला होता. या प्रक्रियेचा अंतिम टप्पा आता करारावर स्वाक्षऱ्या करून पूर्ण करण्यात आला.एलस्टॉम ट्रान्सपोर्ट यांच्याद्वारे एकूण २४८ अत्याधुनिक मेट्रो डब्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी ८ डबे असलेल्या एकूण ३१ गाड्यांचे अत्याधुनिक डिझाईन, उत्पादन, तपासणी आदी कामाचा समावेश आहे. गाडीची रुंदी ३.२ मीटर असून लांबी १८० मीटर इतकी असेल.