Join us
Daily Top 2Weekly Top 5

जव्हारमध्ये भारनियमन सुरू

By admin | Updated: May 22, 2014 03:57 IST

जव्हार शहराचे वीज बिल भरण्याचे प्रमाण ९० टक्केच्यावर असल्यामुळे जव्हार हा अ वर्गात असल्यामुळे जव्हारमध्ये लोडशेडिंग नव्हते.

जव्हार : जव्हार शहराचे वीज बिल भरण्याचे प्रमाण ९० टक्केच्यावर असल्यामुळे जव्हार हा अ वर्गात असल्यामुळे जव्हारमध्ये लोडशेडिंग नव्हते. मात्र चंद्रपूर येथील ३ मुख्य युनिट बंद पडल्यामुळे नियमित वीज बंद करण्यात येत अचानक लोडशेडिंगचे आदेश वरिष्ठ कार्यालयातून आल्यावर लोडशेडिंग करावे लागत आहे, अशी माहिती वीज वितरण विभागाकडून देण्यात आली. मे महिना असल्यामुळे पारा ४२ अंशावर गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा त्यात अचानक होणार भारनियमन यामुळे जव्हारकर त्रस्त झाले आहेत. लस्सी, कोल्डडिंÑक्स, थंड पेयांच्या दुकानाकडे नागरिकांची गर्दी दिसत आहे. पूर्वी जव्हारला मिनी महाबळेश्वरची ख्याती होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे कधी नव्हे अशी उन्हाचे चटके पारा वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक आरोग्याच्या समस्या ही निर्माण झाल्या आहेत. त्यातच पाण्याच्या समस्येनेही डोके वर काढल्याने लोकांचे प्रचंड हाल होत आहे.(वार्ताहर)