Join us
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सल्लागारपदी डॉ. सतीश पावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:06 IST

मुंबई : ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक, माजी संपादक डॉ. सतीश पावडे यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सल्लागारपदी नियुक्ती ...

मुंबई : ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, समीक्षक, माजी संपादक डॉ. सतीश पावडे यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्रचे संस्थापक, अध्यक्ष, संपादक राजा माने यांनी ही नियुक्ती केली आहे.

डॉ. सतीश पावडे यांनी १९८०मध्ये पत्रकारितेला प्रारंभ केला आणि लोकमत, नागपूर पत्रिका, नागपूर टाईम्स, जनवाद, राष्ट्रदूत, महाविदर्भ आदी दैनिकांमध्ये संपादकीय पदांवर प्रदीर्घ काळ काम केले. खासगी व दूरदर्शनसाठी; तसेच शासनासाठीही त्यांनी अनेक लघुपटांसाठी निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी जबाबदारी सांभाळली आहे.

नाटक, चरित्र आणि समीक्षाविषयक त्यांची २४ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमीच्या सेन्साॅर बोर्डाचे सदस्य; तसेच मराठी विश्वकोषाच्या नाटक ज्ञानमंडळाचे सल्लागार सदस्य म्हणून ते काम करत आहेत. तसेच वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या परफाॅर्मिंग आर्ट्स (फिल्म अँड थिएटर) विभागात ते वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.