Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त क्षेत्रात बांधकामाला परवानगी नाही

By admin | Updated: December 28, 2014 23:15 IST

येथील १९८९ च्या महाप्रलयानंतर कोळीवाडा, बंगलेआळी भागातील नागरिकांचे पुनर्वसन करून त्यांना मुंबई - गोवा महामार्गाजवळची जागा देण्यात आली आहे.

नागोठणे : येथील १९८९ च्या महाप्रलयानंतर कोळीवाडा, बंगलेआळी भागातील नागरिकांचे पुनर्वसन करून त्यांना मुंबई - गोवा महामार्गाजवळची जागा देण्यात आली आहे. मात्र यातील काही ग्रामस्थांनी पूरग्रस्त क्षेत्रातील जागेचा ताबा न सोडल्याने या जागांमध्ये सध्या बांधकामांचे पेव फुटले आहे. रोहे तहसीलदार उर्मिला पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून या भागात नव्याने बांधकामास परवानगी देवू नये, अशी सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली आहे. पाटील यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे अनधिकृत बांधकामकर्त्यांचे धाबे दणाणले आहे. तातडीने ही महत्वपूर्ण सूचना केली आहे. त्यानुसार नुकतीच पाटील यांनी रोहे तहसील कार्यालयात या संबंधात ही बैठक घेतली. त्यावेळी रोहे पंचायत समिती, भूमी अभिलेख खाते, नागोठणे मंडळ अधिकारी, तलाठी तसेच ग्रामविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)