Join us

मेट्रोच्या प्रवाशांना २० जूनपर्यंत दिलासा

By admin | Updated: May 3, 2016 17:39 IST

मुंबई मेट्रोची भाववाढ पुन्हा टळली आहे. मेट्रो भाववाढीच्या याचिकेवरची सुनावणी २० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना २० जूनपर्यंत दिलासा मिळाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई. दि ३ : मुंबई मेट्रोची भाववाढ पुन्हा टळली आहे. मेट्रो भाववाढीच्या याचिकेवरची सुनावणी २० जूनपर्यंत पुढे ढकलली आहे त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना २० जूनपर्यंत दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयात दरवाढीची अंतिम सुनावणी २० जूनला होणार आहे. 
१ डिसेंबर २०१५ पासून मेट्रोच्या भाड्यात ५ रुपये वाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वनने घेतला. या निर्णयाविरुद्ध एमएमआरडीएने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.