Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘महापुरुषांचे आदर्श विचारात घ्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:06 IST

मुंबई : मालाड पश्चिम येथे सम्राट महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ ...

मुंबई : मालाड पश्चिम येथे सम्राट महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) मालाड विधानसभा अध्यक्ष सुनील गमरे उपिस्थत होते. ते म्हणाले की, महिलांनी चूल आणि मूल सांभाळण्यापुरतेच मर्यादित न राहता महापुरुषांचे आदर्श विचारात घेऊन शैक्षणिक, शासकीय, राजकीय क्षेत्रात उतरून शासनकर्त्या जमातीचे सूत्रे हाती घ्यावीत. याप्रसंगी प्रियंका उघडे यांनी लहान मुलांच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

अनधिकृतरीत्या वाहनांची पार्किंग

मुंबई : कुर्ला-अंधेरी रस्त्यावरील जरीमरी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहने अनधिकृतरीत्या उभी केलेली असतात. यामुळे येथील मार्ग अरुंद होतो. परिणामी बेस्ट बस आणि अवजड वाहनांना मार्ग काढताना अडचणी येतात. याव्यतिरिक्त पादचाऱ्यांनादेखील चालण्यास जागा शिल्लक राहत नाही. यामुळे अनधिकृतरीत्या पार्क करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

एलबीएसवर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लालबहादूर शास्त्री मार्गावर सायनपासून कुर्ला येथील फिनिक्स मॉलपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्त्याची कामे करताना लावण्यात आलेले साहित्य वेडेवाकडे पडल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास होत आहे. रस्त्यावरील कामाचे साहित्य नीट ठेवले तरी कोंडी फुटण्यास मदत होईल, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.