Join us

मुंबई काँग्रेसमधील वाद हातघाईवर, एक कार्यकर्ता जखमी

By admin | Updated: February 2, 2017 18:21 IST

महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मुंबई काँग्रेसमध्ये धुमसत असलेला वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे.

 ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 2 -  महानगरपालिका निवडणुकीपूर्वी  मुंबई काँग्रेसमध्ये धुमसत असलेला वाद आता हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. आज मुंबईत सुरू असलेल्या काँग्रेसच्या बैठकीदरम्यान काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास कामत गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

यावेळी झालेल्या गोंधळात एक कार्यकर्ता जखमी झाला असून, दोन्ही गटातील वाद मिटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. त्यामुळे निवडणुूकीपूर्वी दोन्ही गटातील वाद मिटण्याची शक्यता धूसर झाली आहे. 

आणखी वाचा 
किशोरी पेडणेकरांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेमध्ये उफाळला असंतोष
शुभा राऊळ भाजपामध्ये ? वादामुळे रोखला श्रद्धा जाधव यांचा फॉर्म
लालबाग-परळमध्ये शिवसेनेला धक्का, नाना आंबोले भाजपामध्ये

गेल्या बऱ्याच काळापासून मुंबई काँग्रेसमध्ये संजय निरुपम आणि गुरुदास कामत यांच्या गटात वाद सुरू आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 115 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर हा वाद अधिकच विकोपाला गेला आहे.  या यादीत निरुपम गटाच्या उमेदवारांना झुकते माप देण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर वाढत्या विरोधामुळे या यादीला स्थगिती देण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता.