Join us
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:09 IST

मुंबई : देशात काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष असून सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष अशी पक्षाची ख्याती ...

मुंबई : देशात काँग्रेस पक्ष हा जुना पक्ष असून सर्व जाती-धर्माच्या नागरिकांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष अशी पक्षाची ख्याती आहे. आम्ही सर्व प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी टीम काँग्रेस म्हणून एकदिलाने काम करून महाराष्ट्रात काँग्रेसला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याची ठाम ग्वाही महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे नवनियुक्त कोषाध्यक्ष डॉ. अमरजीत सिंह मनहास यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना दिली.

डॉ. अमरजीत सिंह मनहास यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या नवनियुक्त सदस्यांनी नाना पटोले यांची त्यांच्या मंत्रालयासमोरील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राज्यात होणाऱ्या आगामी पालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त

सरचिटणीस झाकीर अहमद, सरचिटणीस भावना जैन आणि मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी सिंह

आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

-------------------------------