अतुल कुलकर्णी - मुंबई
विधानसभेच्या निवडणुकीतील दारुण पराभवाने खचून गेलेली काँग्रेस अजूनही या धक्क्यातून बाहेर पडलेली नाही. बहुतांश पक्षांचे गटनेते निवडले गेले, पक्षीय बैठका झाल्या, विजयाची, पराभवाची कारणमीमांसाही झाली; मात्र काँग्रेस पक्षाला आपला गटनेता निवडीसाठीची बैठक घेण्यासही वेळ मिळालेला नाही.
आमच्या पक्षाचा गटनेता निवडला गेल्यानंतर पक्षाची पुढील दिशा ठरवू, असे पक्षाचे नेते सांगत आहेत. कोणीही यावर स्पष्टपणो बोलण्यास तयार नाही मात्र दिल्लीहून जोर्पयत निरोप येत नाही तोर्पयत बैठक कशी घेणार, असे पक्षाचे प्रवक्ते सांगत आहेत. शिवसेनेने त्यांच्या पक्षाची बैठक घेऊन सगळे अधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देऊ केले. राष्ट्रवादीनेदेखील अजित पवार यांची पक्षाच्या नेतेपदी आणि आर.आर. पाटील यांची विधानसभेत गटनेते म्हणून निवड केली. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांची निवड केली.
मात्र काँग्रेसच्या गोटात पूर्णत:
सामसूम आहे.
प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अजूनही मुंबईबाहेरच आहेत. पक्षात एक मोठा गट चव्हाण यांच्याविरोधात कार्यरत झाला असून पक्षाच्या गटनेतेपदासाठी राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह पतंगराव कदम यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. एवढा मोठा पराभव होऊनही पक्षाचे वरिष्ठ नेते अजूनही गटनेतेपदासाठीदेखील फिल्डिंग लावून बसतात; याला काय म्हणावे अशी प्रतिक्रिया पराभूत झालेल्या मुंबईतील काही आमदारांनी व्यक्त केली आहे. बैठक कधी घ्यायची, किंवा कोणाला गटनेता करायचे याविषयी कसलीही सूचना आलेली नाही. ही निवड प्रक्रिया कदाचित 5 ते 1क् तारखेर्पयत लांबेल असेही समजते.