Join us
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

By admin | Updated: September 6, 2014 22:57 IST

एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्यात आल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.

जितेंद्र कालेकर-ठाणो
एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्यात आल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. तर दुसरीकडे स्वबळावर निवडणुका लढविण्याचीही तयारी  शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने चालविली आहे. 
174 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी काँग्रेसने दर्शविली आहे. अर्थात, काँग्रेसबरोबरच्या वाटाघाटी पूर्ण झालेल्या नसतांना  राष्ट्रवादीनेही आता काँग्रेसप्रमाणोच  ठाण्यासह 288 मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन जोरदार तयारी केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
ठाणो शहरात ओवळा माजीवडा, कळवा मुंब्रा, कोपरी पाचपाखाडी आणि ठाणो हे चार मतदार संघ येतात. या चारपैकी जितेंद्र आव्हाड यांच्या रुपाने राष्ट्रवादीला केवळ कळवा मुंब्रा ही एकच जागा जिंकता आलेली आहे. उर्वरित तिन्ही जागा या काँग्रेस लढविणार असल्याचे स्पष्ट असले तरी ठाणो, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा -माजीवडा या तिन्ही जागा आपल्या वाटय़ाला याव्यात, अशी राष्ट्रवादीची जोरदार मागणी आहे. अर्थात, ही संपूर्ण निर्णय प्रक्रीया व्हायची असली तरी राष्ट्रवादीनेही सर्वच जागांवर अर्ज मागविले आणि त्यानुसार इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. ठाण्यातून देवराम भोईर, संजय भोईर, सुहास देसाई, दीपक क्षत्रिय आणि नजीब मुल्ला या इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. तर कोपरीमधून नगरसेवक भरत चव्हाण, डॉ. बिपीन महाले तर ओवळा माजीवडयातून हणमंत जगदाळे व भाईंदरचे पदाधिकारी असिफ शेख आणि मुंब्य्रातून नगरसेवक मनोहर साळवी आणि विद्यमान आमदार व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड  आदींनी मुलाखती दिल्या आहेत. ठाण्यातून गेल्या वेळी आघाडीच्या उमेदवारासमोर बंडखोरी करून आव्हान उभे करणारे देवराम भोईर यांच्याबद्दल काँग्रेसमध्येच नाराजी आहे. तीच परिस्थिती संजय भोईरांची आहे. सुहास देसाई, दीपक क्षत्रिय यांचा फारसा दबदबा नाही. तर नजिब मुल्ला यांचे केवळ राबोडी या त्यांच्या प्रभागतच वर्चस्व आहे. त्यामुळे शिवसेना भाजपा युतीला टक्कर देणारा त्याच ताकदीच्या नेत्यालाच उभे करण्यात यावे, असाही एक मतप्रवाह पक्षात सुरु आहे.
कोपरी पाचपाखाडीतील भरत चव्हाण यांच्याकडे राष्ट्रवादी रिक्षा टॅक्सी युनियन आणि त्यांचा प्रभाग वगळता फारशी ताकद नाही. तर डॉ. महाले यांनाही जनसंपर्काची गरज आहे. तरीही या जागेवर राष्ट्रवादीने जोरदार तयारी केल्याचा दावा केला आहे.
कळवा मुंब्य्रात मात्र आव्हाड यांच्या जोडीला मनोहर साळवी या नगरसेवकाने मुलाखत दिली आहे. आव्हाडांना मंत्रिपद देऊन त्यांची ताकद आणखी वाढविण्याचा पक्षाने प्रय} केल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची अटकळ आहे. 
ओवळा माजीवडय़ायातून रिपाइं इंदिसेंचा पाठींबा असल्याचा दावा जगदाळे यांनी केला असून भाईंदरच्या शेख यांची ताकद ठराविक भागापूरती असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याप्रमाणात ओवळा माजीवडय़ाचा बराचसा भाग ठाणो महापालिकेकडे असल्यामुळे तसेच शिवसेना भाजपा युतीला टक्कर देण्यासाठी  ही जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशीही  पदाधिका:यांची मागणी आहे.
याऊलट काँग्रेसनेही चारही जागांवर मुलाखती घेतल्या असून या प्रत्येक ठिकाणी 14 ते 15 इच्छुक आहेत. अर्थात, आघाडीचा  निर्णय हा दिल्ली स्तरावर घेण्यात येणार आहे. वरील चार पैकी कळवा मुंब्रा वगळता तीन्ही जागा काँग्रेसलाच मिळाव्यात अशी जोरदार मागणी ठाणो काँग्रेसकडून पक्ष o्रेष्ठींकडे केल्याची माहिती ठाणो शहर काँग्रेसचे अध्यक्ष बाळकृष्ण पूण्रेकर यांनी दिली.   
अर्थात, आघाडीची चर्चा अजून झालेली नसल्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नसल्याचेही पूर्णेकर यांनी स्पष्ट केले आहे.