Join us  

काँग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे शिवसेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 1:18 AM

१४ वर्षांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक विठ्ठल लोकरेही शिवसेनेत परतले

मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागताच पक्षांतराला सुरुवात झाली आहे. १४ वर्षांपूर्वी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक विठ्ठल लोकरेही शिवसेनेत परतले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकरे दाम्पत्याला सोमवारी मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधले.मानखुर्द-शिवाजीनगरच्या वॉर्ड क्रमांक १४१चे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत सपत्नीक प्रवेश केला. मानखुर्दमधून तीनवेळा नगरसेवकपदी ते निवडून आले आहेत. ९०च्या दशकात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्द सुरू केली. मानखुर्दमधून आगामी विधानसभा निवडणुकीत ते इच्छुक असल्याचे सूत्रांकडून समजते. महापालिका मुख्यालयात सोमवारी त्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर व आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे नगरसेवकपदाचा राजीनामा सुपुर्द केला. महापालिका, राज्य आणि केंद्र या तीनही ठिकाणी शिवसेना-भाजपचे सरकार असल्याने मानखुर्द-शिवाजीनगरचा सर्वांगीण विकास आता शक्य आहे. या परिसरातील जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिवबंधन बांधले असल्याचे स्पष्टीकरण पक्ष प्रवेशानंतर त्यांनी दिले.

टॅग्स :काँग्रेसशिवसेना