Join us

मुलुुंडमध्ये काँग्रेसची परिवर्तन रॅली झाली महारॅली

By admin | Updated: October 13, 2014 04:11 IST

गेल्या २५ वर्षांमध्ये मुलुंडच्या विकासाकडे दुर्लक्ष करणा-या स्थानिक राज्यकर्त्यांना उलथून टाकण्याच्या इराद्याने मुलुंडमधील काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा यांनी

मुंबई : गेल्या २५ वर्षांमध्ये मुलुंडच्या विकासाकडे दुर्लक्ष करणा-या स्थानिक राज्यकर्त्यांना उलथून टाकण्याच्या इराद्याने मुलुंडमधील काँग्रेसचे उमेदवार चरणसिंग सप्रा यांनी आज परिवर्तन रॅलीचे आयोजन केले होते. मुलुंडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने या रॅलीचे महारॅलीत रूपांतर झाले.मुलुंडच्या सर्वांगीण विकासासाठी आपले व्हिजन जनतेसमोर मांडण्यासाठी सप्रा यांनी आज संपूर्ण मतदारसंघात परिवर्तन रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांत येथून निवडून आलेल्यांनी मुलुंडच्या विकासासाठी काय करायला हवे होते आणि प्रत्यक्षात काय केले, हे सप्रा यांनी जनतेसमोर ठेवले. तसेच विधान परिषद सदस्य असताना मुलुंडसाठी स्वत: केलेल्या कामांची माहितीही त्यांनी दिली. या रॅलीत मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाहे. प्रत्येक ठिकाणी या रॅलीचे जंगी स्वागत झाले. भाजपाच्या अभेद्य किल्ल्यात काँग्रेसने एकप्रकारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. (प्रतिनिधी)