मुंबई : राज्य प्रशासनात पुन्हा फेरबदल करण्यात आले असून, तानाजी सत्रे यांना कोकण विभागीय महसूल आयुक्तपदी आणण्यात आले आहे; तर याआधी आयुक्तपदी असलेले राधेश्याम मोपलवार यांची बदली महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक या पदावर करण्यात आली आहे.१९९३च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सत्रे हे आतापर्यंत महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीचे (एमएडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते. व्ही.के. कानडे यांची उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाच्या सदस्य सचिवपदी तर व्ही.के. गौतम यांची माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सचिवपदी मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. पुणे येथील मुख्यालयात महिला व बालकल्याण विभागाचे आयुक्त असलेले आर.आर. चव्हाण हे आता सिडकोचे नवे सहव्यवस्थापकीय संचालक असतील. नागपुरात मुख्यालय असलेल्या राज्य खनिकर्म महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी निरुपमा डांगे यांची बदली करण्यात आली आहे.
कोकण विभागीय आयुक्तपदी तानाची सत्रे
By admin | Updated: September 1, 2015 01:38 IST