Join us
Daily Top 2Weekly Top 5

हृदय प्रत्यारोपण झालेल्या मुलाची प्रकृती स्थिर

By admin | Updated: August 5, 2015 01:50 IST

मुंबईत सोमवारी २२ वर्षीय तरूणावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. तो सध्या डॉक्टरांच्या

मुंबई: मुंबईत सोमवारी २२ वर्षीय तरूणावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्या मुलाची प्रकृती आता स्थिर आहे. तो सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात दाखल असल्याची माहिती फोर्टिस रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. पुण्यातील रुग्णाने अवयवदान केल्याने या तरुणावर जीवदान मिळाले. शस्त्रक्रिया झाल्यावर मंगळवारी या तरुणाचे हृदय आणि इतर अवयवांचे कार्य पूर्ववत होत आहे. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पुढच्या काही आठवड्यात तो सामान्य आयुष्य जगू शकतो, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. याच रुग्णालयात २९ वर्षीय तरुण हृदयाच्या प्रतिक्षेत आहे. त्यालाही हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)