Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगणक शिक्षकांची प्रकृती खालावली

By admin | Updated: May 25, 2017 02:02 IST

कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान योजनेतील सहा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कायम सेवेत घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषणास बसलेल्या माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान योजनेतील सहा शिक्षकांची प्रकृती खालावल्याने त्यांना तेजपाल रूग्णालयात दाखल करण्यात आले. पाच शिक्षकांना बुधवारी रात्री उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून एका शिक्षकाला रूग्णालयात भरती करण्यात आले.महाराष्ट्र राज्य श्रमिक संघाचे सरचिटणीस जीवन सुरूडे म्हणाले की, या प्रश्नी अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर मंगळवारी झालेल्या भेटीत ठाकरे यांनी दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिले.दरम्यान, मंगळवारी खासदार मजीद मेमन यांनीही भेट देत प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली. या प्रश्नी मुख्यमंत्री आणि केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. शिवाय गरज पडल्यास याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करू, असेही मेमन यांनी सांगितले.