Join us
Daily Top 2Weekly Top 5

संगणक चोरणारी दुकली गजाआड

By admin | Updated: October 12, 2016 05:27 IST

कल्याण पूर्वेतील मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा नियंत्रण करणाऱ्या कार्यालयातील दोन संगणक व स्टेशनरी चोरल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने सात महिन्यानंतर

कल्याण : कल्याण पूर्वेतील मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा नियंत्रण करणाऱ्या कार्यालयातील दोन संगणक व स्टेशनरी चोरल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाने सात महिन्यानंतर दोघांना अटक केली आहे. खलील अब्दुल खालिद (२४) आणि इम्तियाज अहमद अब्दुल हकीम खान (३७) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २ सीपीयू, २ मॉनिटर ,एक प्रिंटर , एक माउस असा १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कल्याण रेल्वेस्थानकात पूर्वेला सिग्नल यंत्रणा नियंत्रण कार्यालय आहे. त्यात मार्चमध्ये चोरी झाली होती. पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेज आणि खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे भंगार चोरताना आरोपींना ताब्यात घेतल्यावर हा गुन्हा उघडकीस आला. आरोपींना रेल्वे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, अशी माहिती कल्याण येथील रेल्वे सुरक्षा बलाचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप ओंबासे यांनी दिली.