Join us
Daily Top 2Weekly Top 5

8 हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा

By admin | Updated: August 22, 2014 01:30 IST

तिस:या टप्प्यातील पाच हजार संगणक प्रयोगशाळांचे (आयसीटी लॅब्स्) प्रातिनिधीक उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी येथे समारंभपूर्वक झाले

47 लाख विद्यार्थी, 61 हजार शिक्षकांना लाभ : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून तिस:या टप्प्यातील पाच हजार संगणक प्रयोगशाळांचे (आयसीटी लॅब्स्) प्रातिनिधीक उद्घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज सकाळी येथे समारंभपूर्वक झाले. माहिममधील सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा होते.
राज्यात पहिल्या टप्प्यात 5क्क्, दुस:या टप्प्यात 2 हजार 5क्क् तर आजच्या तिस:या टप्प्यात 5 हजार अशा एकूण 8 हजार शाळांमध्ये या प्रयोगशाळा आता सुरू करण्यात आल्या आहेत. आयएलएफएस आणि बिर्ला-व्हिजन इंडिया यांच्यामार्फत या प्रकल्पाची उभारणी आणि संचालन केले जात आहे. आजच्या समारंभाला राज्यमंत्री फौजिया खान आणि शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे, शिक्षण आयुक्त एस.चोकलिंगम उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाची विस्ताराने माहिती घेतली आणि प्रशंसाही केली. या उपक्रमाचा लाभ सुमारे 47 लाख विद्याथ्र्याना होणार आहे. 61 हजार शिक्षकांना संगणक प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक प्रयोगशाळेत यूपीएस, प्रिंटर, एलसीडी प्रोजेक्टर, जनरेटर, आवश्यक फर्निचर, सॉफ्टवेअर आणि इंटरनेट सुविधा देण्यात आली आहे. आजच्या उद्घाटन समारंभाला माध्यमिक विभागाचे सहसंचालक दिनकर पाटील, सरस्वती मंदिर एज्यूकेशन सोसायटीचे चेअरमन विनय रेगे, अध्यक्ष एस.एन.सुखटणकर, सचिव संजय सुखटणकर, विश्वस्त अॅड.जी.आर.रेगे, पी.एन.शानबाग, प्राचार्य दीपा जुनेजा आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)