Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॅम्पा कोलाची कारवाई पूर्ण

By admin | Updated: June 29, 2014 00:42 IST

आज पूर्ण झाली़ त्यानुसार 9क् वीज जोडण्या, 51 गॅस लाइन आणि 9क् पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आले आहेत़

मुंबई : गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेली वरळी येथील कॅम्पा कोलावरील कारवाई अखेर आज पूर्ण झाली़ त्यानुसार 9क् वीज जोडण्या, 51 गॅस लाइन आणि 9क् पाण्याचे कनेक्शन तोडण्यात आले आहेत़ याबाबतचा अहवाल तयार झाल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय होणार आह़े
कॅम्पा कोलामधील 1क्क् बेकायदा मजल्यांवर सोमवारपासून कारवाई सुरू झाली़ गेल्या आठवडय़ात तीन दिवस सलग विरोध करून पालिकेची कारवाई थोपवून धरणा:या येथील रहिवाशांनी अखेर गेल्या शुक्रवारी माघार घेतली होती़ त्यानंतर पालिकेने येथील बेकायदा मजल्यांवरील फ्लॅटचे वीज, पाणी व गॅस कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली होती़ ही कारवाई पूर्ण झाल्यामुळे आता याबाबतचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येणार आह़े त्यानंतर कॅम्पा कोलावरील पुढील कारवाईची दिशा ठरणार असल्याचे एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े (प्रतिनिधी)