Join us
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचार सुनावणीत तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: March 8, 2015 22:44 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) सार्वजनिक बांधकाम कृषी, लघुपाटबंधारे, वन इ. विभागामार्फत झालेल्या अनेक कामामधील लोकमतने उघडकीस

हितेन नाईक, पालघररोजगार हमी योजनेंतर्गत (मनरेगा) सार्वजनिक बांधकाम कृषी, लघुपाटबंधारे, वन इ. विभागामार्फत झालेल्या अनेक कामामधील लोकमतने उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराच्या जनसुनावणीच्या वेळी मजुरांनी तक्रारींचा पाऊस पाडला. मंत्रालय पातळीवरून या भ्रष्टाचाराची गंभीरपणे दखल घेऊन रोजगार हमी विभाग व आरोहण संस्थेमार्फत या कामाचे सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेद्वारा (सोशल आॅडीट) शहानिशा व चौकशी सुरू झाली आहे. जव्हार तालुक्यापासून सुरू झालेल्या या जनसुनवणीमध्ये सात गावांमधील मजूरांनी तक्रारींचा पाऊस पाडला.जव्हार तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, कृषी विभाग, वनविभाग, लघु पाटबंधारे यांच्यामार्फत पिंपळशेत, वावरवांगणी इ. ठिकाणी सन २०११-१२, १२-१३ व सन १३-१४ या वर्षात मोठ्या प्रमाणात दगडीनाला बांध, बांधकाम, पाड्यातील रस्ते, डोंगर उतारावर चर खोदणे, इ.ची कामे करण्यात आल्याची दर्शविण्यात आली होती. परंतु या कामात मोठा भ्रष्टाचार होऊन रोहयोअंतर्गत केलेल्या कामात मृत व्यक्ती, अपंग, अंध, बँक कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करीत असलेल्या व्यक्तींची नावे मस्टरमध्ये नोंदविण्यात आली असताना शासनाकडे सादर करण्यास विलंब होत आहे. यातून सुटका करून घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करीत आहेत. जनसुनवाई दरम्यान जव्हार महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अनिल पाटील, अ‍ॅड. जयेश लोखंडे, मजुराचे दोन प्रतिनिधींनी पॅनालीस्ट म्हणून काम पाहिले. जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, तलासरी, डहाणू इ. भागातील कामांचेही सोशल आॅडीट करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.