Join us

आयोजकांविरूध्द फसवणुकीची तक्रार

By admin | Updated: August 11, 2014 00:02 IST

खेड तालुका : गोविंदांचे पोलिसांना निवेदन

खेड : दहीहंडी उत्सवामध्ये खेड, दापोली तसेच मंडणगड तालुक्यातील अनेक गोविंदा पथके खेडमधील येथील दहीहंडी फोडण्याचा मान मिळवतात़ अशा प्रकारे होत असलेल्या फसवणुकीविरोधात आता गोविंदा पथकांनी दंड थोपटले आहेत. आयोजकांची पोलिसांनी त्याच वेळी चौकशी करावी. अशा आयोजकांना उत्सव काळात बंधने आणावीत, अशी मागणी खेड शहर आणि ग्रामीण भागातील गोविंदा पथकांनी केली आहे़ खेड शहरातील कुवारसाई येथील श्रीकृष्ण गोविंदा पथक, खेडमधील हिंदुराज, वेताळवाडी येथील भैरवनाथ, भडगाव येथील श्रीकृष्ण, चाकाळे यथील महालक्ष्मी, चिंचघर येथील भैरवनाथ, खारी-सुसेरी येथील खेमनाथ, खेड येथील जय हनुमान आणि भरणे येथील काळकाई गोविंदा पथक यांनी तशा आशयाचे निवेदन खेड पोलीस ठाण्याला दिले आहे़ या निवेदनात उत्सव काळात उपस्थित असलेल्या पोलिसांनीही आवश्यकता भासल्यास हस्तक्षेप करावा, असे त्यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़ आठवड्यावर हा उत्सव येऊन ठेपला आहे. अशावेळी मोठमोठ्या रकमा जाहीर करून आयोजक संबंधित गोविंदा पथकांना ती देण्यास टाळाटाळ करतात़ खेडमध्ये काही उत्सव मंडळांच्या दहीहड्या ९ किंवा १० थरांच्या लावलेल्या असतात़ एवढ्या उंचीच्या दहीहंड्या फोडणे गोविंदा पथकांना शक्य नसते. मात्र, ती फोडण्यासाठी गोविंदांकडून प्रयत्न केले जातात़ अशी दहीहंडी फोडताना ८ थरांची सलामीही दिली जाते. मात्र, आयोजक हा विचार न करता दहीहंडीची उंची कमी करून ती फोडल्यास आयत्यावेळी जाहीर केलेली रक्कम बक्षीस म्हणून दिली जाते. नववी किंवा दहा थरांची दहीहंडी फोडणे अशक्य असल्यानेच काही आयोजक मोठ्या रकमेची आमिषे दाखवतात.सर्वांत जास्त थर लावेल, अशा गोविंदांना अगोदरच जाहीर केलेली रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र, फसवणुकीच्या उद्देशानेच प्रत्यक्षात उंची कमी करून आयत्यावेळी ठरविण्यात आलेली ५ किंवा १० हजार रूपयांची रक्कम बक्षीस म्हणून दिली जात असल्याचे या गोविंदा पथकाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)ठरलेली रक्कम दिली जात नसल्याचा आरोप.आयोजकांना उत्सव काळात बंधने घालण्याची मागणी.पोलिसांनी लक्ष ठेवण्याची केली निवेदनात मागणी.