Join us

सलमान खानची सायबर सेलकडे तक्रार

By admin | Updated: July 9, 2015 03:09 IST

अभिनेता सलमान खानचे नाव वापरून तयार केलेल्या एका पोस्टने सोशल मीडियावरून धुमाकूळ घातला. मात्र ही पोस्ट आपली नाही, पोस्टमधली वाक्येही आपली नाहीत,

मुंबई : अभिनेता सलमान खानचे नाव वापरून तयार केलेल्या एका पोस्टने सोशल मीडियावरून धुमाकूळ घातला. मात्र ही पोस्ट आपली नाही, पोस्टमधली वाक्येही आपली नाहीत, असा दावा करीत सलमानने बुधवारी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार सायबर सेल गुन्हा नोंदवून तपास करणार आहे. सलमानचा‘बजरंगी भाईजान’ १७ जुलैला प्रदर्शित होणार आहे. मात्र हा चित्रपट हिट करण्यासाठी मला एकाच समाजातल्या प्रेक्षकांची गरज नाही, असे सलमान बोलला आणि तशी बातमी एका हिंदी खासगी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली, अशी पोस्ट सोशल मीडियावरून फिरू लागली. ही माहिती मिळताच सलमानच्या वतीने त्याच्या प्रतिनिधीने सायबर सेल गाठून अशाप्रकारची पोस्ट तयार करणे, त्यात सलमानच्या नावाचा वापर करणे, याबद्दल तक्रार दिली. तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. गुन्हे शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार वरकरणी ही पोस्ट बनावट दिसते. तसेच पोस्टमध्ये दिसत असलेल्या वृत्तवाहिनीनेही अशाप्रकारची कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही, असे कळविले आहे.