Join us  

शहरात अवैध दारू विकत असल्यास तक्रार कोठे कराल? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:02 AM

तुम्ही थेट उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक किंवा विभागीय कार्यालयात तक्रार करू शकतात. 

मुंबई :  ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र मोठी रेलचेल सुरू आहे. मद्यप्रेमींकडून पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी विविध ब्रँडच्या विदेशी दारूंची मागणी अधिक आहे. याचाच फायदा घेत दारूची अवैधरीत्या वाहतूक किंवा बनावट दारूची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. अशा लोकांबाबत माहिती असल्यास थेट उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक किंवा विभागीय कार्यालयात तक्रार करू शकतात. 

मुंबई उपनगर जिल्ह्यात एप्रिल २०२३ पासून ५८० कारवाया झाल्या आहेत. या कारवाईत ५४० जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाईत एकूण २ कोटी १६ लाख ८० हजार २२९ रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ख्रिसमस, नववर्ष आले की अवैध दारूची वाहतूक, विक्री आणि साठा करणारे अधिक सक्रिय होतात. अशा संशयास्पद हालचाली नागरिकांनी दिसून आल्यास त्यांनी आम्हाला आमच्या टोल फ्री नंबरवर किंवा कार्यालयात माहिती दिल्यास त्याचे नाव गुपित ठेवून २४ तासात कारवाई करण्यात येईल.- नितीन घुले, अधीक्षक, उपनगर उत्पादन शुल्क विभाग

सर्वाधिक कारवाया झोपडपट्टी परिसरात :

 मुंबई उत्पादन शुल्क विभागाने शहरातील हातभट्टी धंदे पूर्णपणे उद्ध्वस्त करत शहर हातभट्टीमुक्त केले आहे.

 तरीसुद्धा धारावी, वडाळा, वरळी, कुलाबा, गोरेगाव, मालाड अशा झोपडपट्टीबहुल भागात बनावट दारू तयार करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत.  

  हातभट्टीची दारू तसेच अवैध दारूची वाहतूक, निर्मिती, साठा केला जात असेल तर शासनाच्या १८००८३३३३३३ टोल फ्री नंबर किंवा २२६६२४०२ दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करू शकतात.

टॅग्स :मुंबईउत्पादन शुल्क विभाग