ठाणो : बिघडलेला फ्रीज विकल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने कंपनी आणि विक्री करणारे स्टोअर या दोघांनाही भरपाई देण्याचे आदेश बजावले आहेत. त्यांना तक्रारदाराला 22 हजार 777 रुपये भरपाई द्यावी लागणार आहे.
मानपाडा येथे राहणारे संकर बसाक यांनी 6 मे 2क्11 ला चितळसर, मानपाडा येथील ‘मोर मेगा स्टोअर’मधून ‘व्हपरुल फ्रॉस्र्ट फ्री’ फ्रीज 17 हजार 777 ला खरेदी केला होता. मात्र महिनाभरात त्यामधून पाण्याची गळती सुरू झाली व दरवाजा बंद होत नव्हता. 21 जुलै 2क्11 ला बसाक यांनी फ्रीजबाबत तक्रार केली. 29 जुलैला फ्रीजचा दरवाजा बदलून दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतरसुद्धा पाणीगळती सुरू राहिल्याने 5 सप्टेंबर 2क्11 ला 31क् लीटर ‘एमटी डीलक्स प्रोफेशनल टिटॉनियम फोर एस’ हा फ्रीज जुन्या फ्रीजऐवजी बदलून दिला. बदलून दिलेला फ्रीज सध्या व्यवस्थित चालू आहे. भरपाईपोटी 46 हजार 141 रुपये द्यावे, अशी मागणी करत बसाक यांनी ‘मोर मेगा स्टोअर’चे व्यवस्थापक आणि व्हपरुल लिमिटेडच्या विरोधात ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली.
याविरोधात ‘मोर मेगा स्टोअर’च्या व्यवस्थापकाने आपण केवळ फ्रीजची विक्री केली आणि दोष दुरुस्त केल्याचे सांगितले. बसाक यांना विकलेला तो फ्रीज बिघडलेलाच होता, असे सांगितले. परंतु, बसाक यांच्या पत्नीला बिघडलेल्या फ्रीजमुळे शारीरिक त्रस झाला, असे ठरवणो चुकीचे आहे, असेही मंचाने स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
च्व्हपरूल कंपनी आणि मोअर मेगा स्टोअरला मंचाने या प्रकरणी दोषी ठरवले आहे. आर्थिक आणि मानसिक त्रसाची भरपाई देण्यास सांगण्यात आले आहे.
च्6 मे 2क्11 ला फ्रिज खरेदी केल्यानंतर महिनाभरातच पाणी गळती होऊ लागली. दरवाजाही बंद होत नव्हता. 21 जुलै 2क्11 ला बसाक यांनी फ्रीजबाबत तक्रार केली. 5 सप्टेंबर 2क्11 ला फ्रिज बदलून देण्यात आला.