Join us
Daily Top 2Weekly Top 5

लैंगिक शोषणाच्या चौकशीसाठी समिती !

By admin | Updated: June 11, 2014 02:20 IST

झोपी गेलेल्या ठाण्यातील राजकीय मंडळींना आता जाग आली असून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठाणो : महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात सजर्रीचे प्रशिक्षण देणा:या डॉक्टरने 3क् शिकाऊ महिला डॉक्टरांबरोबर अश्लील चाळे केल्याच्या प्रकरणाला महिना उलटल्यानंतर झोपी गेलेल्या ठाण्यातील राजकीय मंडळींना आता जाग आली असून, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना या संदर्भात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या ठिकाणी भेट देऊन या प्रकरणी वैद्यकीय समिती सखोल चौकशी करणार असल्याचे स्पष्ट केले. यामुळे दीड महिन्यानंतर शैलेश्वर नटराजन याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. 
कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार साधारणपणो दीड महिन्यापूर्वी घडला होता. त्यानंतर या प्रकरणी महापालिकेच्या समितीमार्फत सुरू होती. समितीचा अहवाल आल्यानंतर पालिका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार होती. परंतु आता या प्रकरणात ठाण्यातील विविध राजकीय मंडळींनी उडी घेत, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच शैलेश्वर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मंगळवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या महाविद्यालयाला भेट देऊन येथील प्रशासनाशी चर्चा केली. परंतु या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात न आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणाची चौकशी आता वैद्यकीय समितीमार्फत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट करून कळवा पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. 
दुसरीकडे शिवसेनेच्या महिला आघाडीच्या लता पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्र्यानी महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना या प्रकरणी जाब विचारला. एवढा मोठा प्रकार घडूनही याप्रकरणी योग्य कारवाई का झाली नाही, असा प्रश्न या वेळी त्यांनी उपस्थित केला. अखेर अधिष्ठात्यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार आता नटराजन याला पोलिसांनी नौपाडा भागातून ताब्यात घेऊन, त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती कळवा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे निरीक्षक आर. डी. मालेकर यांनी दिली.  (प्रतिनिधी)
 
़़़तोर्पयत उशीर झाला होता
च्कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रकार साधारणपणो दीड महिन्यापूर्वी घडला होता. त्यानंतर या प्रकरणाची महापालिकेच्या समितीमार्फत सुरू होती. या समितीचा अहवाल आल्यानंतर पालिका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार होती, परंतु तोर्पयत शैलेश्वर नटराजन यांना निलंबित करण्यात आले होते.