मुंबई : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कारार्थीची निवड करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत समिती पुनर्गठित केली आहे.सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे या समितीचे अध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव हे सदस्य तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीमध्ये सदस्य सचिव असतील. सतार वादक उस्मान खाँ, तबला वादक सदानंद नायमपल्ली, गायक श्याम गुंडावार, बाळ पुरोहित, विजय सरदेशमुख, गायिका शुभदा पराडकर भारती वैशंपायन यांचा समितीमध्ये अशासकीय सदस्य म्हणून समावेश आहे. या समितीचा कालावधी तीन वर्षांसाठी किंवा नवीन समितीची पुनर्रचना होईपर्यंत राहील.
पुरस्कारार्थी निवडीसाठी समिती पुनर्गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 06:07 IST