मुंबई : ‘मेक इन महाराष्ट्र’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात उद्योगधंद्यांची वाढ व्हावी, गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली.उद्योगांसाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करणे, परवाने मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत ही समिती धोरणात्मक निर्णय घेईल. या समितीत मुख्यमंत्र्यांसह उद्योग व वित्त मंत्र्यांसह मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिवांचा समावेश असेल. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शक्तीप्रदान समितीचीही स्थापना केलीे. मेक इन महाराष्ट्रांतर्गत एक महिन्यात परवाना देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार परवाने वितरीत व्हावीत, यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती कार्य करेल. (प्रतिनिधी)