Join us
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा दुरुस्तीला आयुक्तांची परवानगी

By admin | Updated: June 14, 2015 02:14 IST

काळबादेवीत पालिकेच्या परवानगीविनाच इमारतीची पुनर्बांधणी सुरू असल्याचे बांधकाम प्रस्ताव विभागाने विभाग कार्यालयाच्या कानावर

मुंबई : काळबादेवीत पालिकेच्या परवानगीविनाच इमारतीची पुनर्बांधणी सुरू असल्याचे बांधकाम प्रस्ताव विभागाने विभाग कार्यालयाच्या कानावर घातले होते़ त्याच इमारतीच्या बांधकामाला काही महिन्यांनी तत्कालीन आयुक्तांनी हिरवा कंदील दाखविल्याचे उजेडात आले आहे़ परंतु या गंभीर प्रकरणाच्या चौकशीची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली आहे़ पोफळीवाडी येथील प्रेम भवन क्ऱ ११ या मोडकळीस आलेल्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी मालकाने पालिकेकडे परवानगी मागितली होती़ स्थायी समितीने घटनास्थळी भेट दिली असता त्या ठिकाणी नवीन इमारत उभी असल्याचे दिसून आले़ त्यानुसार संबंधित अधिकारी व मालकावर कारवाईची मागणी स्थायी समितीने केली होती़ मात्र प्रशासनाने याबाबत खुलासा करताना तत्कालीन आयुक्तांनी मार्च २०१५ मध्ये इमारतीच्या पुनर्बांधणीला परवानगी दिल्याचे सांगत सदस्यांना धक्काच दिला़ (प्रतिनिधी)वॉर्डाकडून कारवाई नाहीचइमारत प्रस्ताव विभागाने डिसेंबर महिन्यात काळबादेवीत पुनर्बांधणी सुरू असलेल्या या इमारतीची खबर विभाग कार्यालयास दिली होती़ मात्र गेले सात महिने या इमारतीवर कोणतीच कारवाई विभाग अधिकाऱ्याने केली नाही़ त्यामुळे स्थायी समितीच्या आदेशानंतर इमारतीवर कारवाई झाली, तरी या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी सदस्यांनी केली़