Join us

आयुक्तांनी घेतला कांजूर मेट्रो डेपोचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:17 IST

आयुक्तांनी घेतला कांजूर मेट्रो डेपोचा आढावालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी गुरुवारी ...

आयुक्तांनी घेतला कांजूर मेट्रो डेपोचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी गुरुवारी एमएमआरडीए अधिकाऱ्यांच्या पथकासह कांजूर मेट्रो डेपो साइटला भेट दिली. प्रकल्पाच्या तपशिलाचा आढावा घेतला व चर्चा केली. या वेळी आर. ए. राजीव यांच्यासह पथकाने कांजूर डेपोला मेट्रो लाइन्सच्या विविध एंट्री पॉइंट्सचीही पाहणी केली. टीमने सीप्झ व्हिलेज मेट्रो स्टेशनवरील मेट्रो लाइन ३ आणि मेट्रो लाइन ६ च्या प्रस्तावित एकत्रीकरण साइटलादेखील भेट दिली.

भुयारी मेट्रो-३ चे कारशेड कांजूरमार्ग येथील भूखंडावर बांधण्यात येईल, असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. मात्र कांजूरमार्ग येथील भूखंडावर केंद्राने दावा केला. परिणामी वाद चिघळला असतानाच राज्य सरकार आपल्या दाव्यावर ठाम आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड मेट्रोच्या कारशेडकरिता देण्यात आला आहे. मेट्रो-३, मेट्रो-६ एकत्र केल्याने खर्च कमी होईल, असा दावा सरकारने केला आहे. कांजूर येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर येथील मातीचे परीक्षणदेखील हाती घेण्यात आले.