Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांना आयुक्तांची श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा पोलीस दलालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामध्ये शहीद झालेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा पोलीस दलालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामध्ये शहीद झालेले अधिकारी, अंमलदारांना पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. एक व्हिडिओ शेअर करून त्यांनी त्यांच्या त्यागाबद्दल विनम्र अभिवादन केले आहे.

कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांना वाचविण्यासाठी कार्यरत असलेल्या राज्यातील ४४ हजारांवर पोलिसांना त्याची लागण झाली आहे. त्यामध्ये ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांपैकी १५२ जणांचा गेल्या पाच महिन्यांत निधन झाले आहे. त्यामध्ये ७५वर मुंबई पोलीस दलातील आहेत. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने गुरुवारच्या अंकात दिले होते. आयुक्त नगराळे यांनी कोरोनाच्या काळात पोलीस बजावीत असलेल्या ड्यूटीबद्दल गौरवोद‌्गार काढले. त्यांच्या कार्याबद्दल आभार मानीत शहीद झाल्याबद्दल त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. त्यांच्या कुटुंबीयांची योग्य दक्षता घेण्याची हमीही त्यांनी दिली आहे.