Join us
Daily Top 2Weekly Top 5

चोराने पळविले महाविद्यालयातील नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:09 IST

मुंबई : माटुंगा येथील एका नामांकित महाविद्यालयातील प्रसाधन गृहातून १८ नळ चोरी केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी ...

मुंबई : माटुंगा येथील एका नामांकित महाविद्यालयातील प्रसाधन गृहातून १८ नळ चोरी केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

......

चाकूच्या धाकाने चालकाला लुटले

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : प्रवाशानेच चाकूच्या धाकाने हरिशंकर रामप्रसाद गुप्ता (वय ४९) या चालकाला लुटल्याची घटना सायन परिसरात सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी सायन पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

....

दवाखान्यातून सव्वा दोन लाखांचे दागिने चोरीला

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दवाखान्याच्या लॉकरमध्ये ठेवलेले सव्वा दोन लाखांच्या दागिन्यावर मोलकरणीने हात साफ केल्याची घटना सायनमध्ये घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्येदेखील तिच्या व्यतिरिक्त कोणीही तेथे गेले नसल्याचे दिसून आले. याप्रकरणी बुधवारी सायन पोलीस ठाण्यात डॉक्टरच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.