Join us
Daily Top 2Weekly Top 5

’राधे माँप्रकरणी पुरावे गोळा करणे सुरू’

By admin | Updated: April 1, 2016 02:04 IST

स्वयंघोषित गुरू राधे माँ हिच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सध्या विमानतळ पोलीस करत आहेत. विमानात त्रिशूळ बाळगल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला असला

मुंबई : स्वयंघोषित गुरू राधे माँ हिच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सध्या विमानतळ पोलीस करत आहेत. विमानात त्रिशूळ बाळगल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल झाला असला, तरी अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.राधे माँ हिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंधेरी कोर्टाने दिले. त्यानुसार आम्ही कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी करत गुन्हा दाखल केला. त्यानुसार राधे माँ आणि अन्य संशयित आरोपींच्या विरोधात पुरावे गोळा करण्याचे काम आम्ही करत असल्याची माहिती एअरपोर्ट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीरंग मयेकर यांनी दिली.