Join us
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्यात झुरळ आणि भाजीत अळी, पश्चिम रेल्वेच्या कर्मचा-यांचा संताप अनावर

By सचिन लुंगसे | Updated: July 10, 2024 19:52 IST

Mumbai News: पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ येथील कॅन्टीनमध्ये कर्मचा-यांना बुधवारी देण्यात आलेल्या जेवणात अळी आढळून आली. त्यामुळे कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला असून, याचा निषेध म्हणून लोअर परळ येथील मुख्य कारखाना प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढत नाराजी व्यक्त केली.

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ येथील कॅन्टीनमध्ये कर्मचा-यांना बुधवारी देण्यात आलेल्या जेवणात अळी आढळून आली. त्यामुळे कर्मचा-यांनी संताप व्यक्त केला असून, याचा निषेध म्हणून लोअर परळ येथील मुख्य कारखाना प्रबंधक कार्यालयावर मोर्चा काढत नाराजी व्यक्त केली.

पश्चिम रेल्वेकडून लोअर परळ येथील कॅन्टीन चालविले जात होते. मात्र महिन्याभरापूर्वी कॅन्टीन कंत्राटदारास चालविण्यास देण्यात आले. त्यानंतर महिन्याभरापासून जेवणाचा दर्जा निकृष्ट आहे. दोन दिवसांपूर्वीही जेवणात झुरळ आढळले होते. तर बुधवारी सकाळी जेवणातल्या भाजीत अळी आढळून आली. यावर कर्मचा-यांनी नाराजी व्यक्त केली असून, असे जेवण मिळाले तर रेल्वे कर्मचा-यांचे आरोग्य धोक्यात येईल, असे म्हटले आहे. दुर्देव म्हणजे पश्चिम रेल्वे प्रशासना याबाबत काहीच भूमिका घेत नसल्याचे नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :अन्नपश्चिम रेल्वेमुंबई