Join us
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रात अडकलेल्या ११ मच्छीमाराना कोस्टगार्डचा आधार

By मनीषा म्हात्रे | Updated: February 12, 2024 00:31 IST

कोस्टगार्डच्या पथकाने तात्काळ पावले उचलत बोटीजवळ जात बचावकार्य सुरू केले. ११ मच्छिमारांची सुखरूप सुटका करत त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले.

मुंबई : भारतीय तटरक्षक दलाने (कोस्टगार्ड) बोटीच्या इंजिनात बिघाड झाल्याने खोल समुद्रात अडकलेल्या ११ मच्छिमारांची  सुखरूप सुटका केली आहे. कोस्टगार्डने ७ आणि ८ फेब्रुवारी दरम्यान हे बचावकार्य केले आहे. 

कोस्टगार्डने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात आयएफबी किंग नावाच्या मच्छिमारी बोटीच्या इंजिनात बिघाड झाल्याने ११ मच्छिमार मिनिकॉय बेटाच्या पश्चिमेपासून तब्बल २८० नॉटिकल मैल दूर खोल समुद्रात अडकून पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कोस्टगार्डच्या पथकाने तात्काळ पावले उचलत बोटीजवळ जात बचावकार्य सुरू केले. ११ मच्छिमारांची सुखरूप सुटका करत त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले.  इंजिनात बिघाड झालेली बोट टो करुन सुरक्षितपणे मिनीकॉय बेट येथे नेले असल्याचे सांगितले. 

टॅग्स :मुंबई