Join us

बदलापुरात एका प्रभागात राष्ट्रवादी विरुध्द युती

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

बदलापूरच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेचे प्रभाकर पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. या प्रभागात शिवसेने पुरुस्कृत

पंकज पाटील, बदलापूरबदलापूरच्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये शिवसेनेचे प्रभाकर पाटील यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. या प्रभागात शिवसेने पुरुस्कृत केलेल्या उमेदवाराला भाजपाने छुपा पाठिंबा देऊन राष्ट्रवादीचे कॅप्टन आशिष दामले यांना पाडण्याची तयारी सुरु केली आहे. शहरात सर्व प्रभागात शिवसेना विरुध्द भाजपा अशी लढत असतांना दामले यांना पाडण्यासाठी या दोन्ही पक्षांनी छुपी युती करुन पाटील यांना ताकद देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. प्रभाग रचनेत बदल झाल्यावर दोन प्रभागातून विभागून झालेल्या बेलवली प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान अपक्ष नगरसेवक आशिष दामले आणि शिवसनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाकर पाटील यांच्यात लढत होत आहे. पाटील हे यापूर्वी तीन वेळा सलग शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. यंदा तांत्रिक चुकीमुळे त्यांचा अर्ज हा अपक्ष झाला. त्यांचा अर्ज अपक्ष ठरल्यावर तत्काळ भाजपचे प्रवक्ते राजेंद्र घोरपडे यांनी पाटील हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार असतील अशी परस्पर घोषणाही केली. दोन दिवसांनी जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाकर पाटील यांनी जाहीरपणे आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार असल्याचे जाहिर केले. तर त्यांचे प्रतिस्पर्धे कॅप्टन दामले हे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पक्ष सोडून गेल्यावर पक्षात टिकून राहिले आहेत.