Join us
Daily Top 2Weekly Top 5

कॉ. विजय गणाचार्य यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:06 IST

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नेहरुनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष कॉ. विजय गणाचार्य यांचे बुधवारी सायंकाळी सुराणा ...

मुंबई : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नेहरुनगर नागरिक मंडळाचे अध्यक्ष कॉ. विजय गणाचार्य यांचे बुधवारी सायंकाळी सुराणा इस्पितळात निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, स्नुषा आणि नातवंडे असा परिवार आहे. चेंबूर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सहनिमंत्रक कॉ. विश्वास उटगी यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विजय गणाचार्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी सांगितले की, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आणि गिरणी कामगारांचे नेते गुलाबराव गणाचार्य यांचा मुलगा म्हणून त्यांची ओळख होती. ते जनरल इन्शुरन्स कर्मचारी होते. जनरल इन्शुरन्स एमप्लाॅई असोसिएशनचे सरचिटणीस म्हणूनदेखील त्यांनी काम पाहिले. निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी संघटना स्थापन केली होती.