Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीएनजी ६ रुपयांनी तर पीएनजी ४ रुपयांनी महागले

By मनोज गडनीस | Updated: October 3, 2022 22:14 IST

१ ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किमतीमध्ये ४० टक्क्यांची वाढ झाली होती

मुंबई - सीएनजी आणि पीएनजी या दोन्ही इंधनाच्या किमतीमध्ये अनुक्रमे ६ आणि ४ रुपयांची वाढ झाली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ अंमलात आली आहे. मुंबई आणि परिसरात महानगर गॅसने या दरवाढीची घोषणा केली. या दरवाढीनंतर, मुंबईत सीएनजीची किंमत प्रति किलो ८६ रुपये इतकी झाली आहे तर पीएनजी गॅसची किंमत ५२ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. 

१ ऑक्टोबरपासून नैसर्गिक वायूच्या आयात किमतीमध्ये ४० टक्क्यांची वाढ झाली होती. त्यानंतर या किमतीमध्ये वाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. सोमवारी सायंकाळी या दरवाढीची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, सर्वसामान्यांना या दरवाढीचा फटका बसणार आहे. सीएनजीची किंमत पेट्रोल-डिझेल इंधनाच्या दरापर्यंत पोहोचताना दिसून येत आहे. 

टॅग्स :पेट्रोलपेट्रोल पंप