Join us
Daily Top 2Weekly Top 5

मंत्र्यांच्या भाषणासाठी मुख्यमंत्र्यांचे मुद्दे!

By admin | Updated: August 14, 2015 01:42 IST

स्वत: एक उत्कृष्ट वक्ते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा

मुंबई : स्वत: एक उत्कृष्ट वक्ते असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शासकीय समारंभामध्ये मंत्र्यांनी त्यांच्या भाषणात कोणत्या मुद्द्यांचा समावेश करावा, याविषयी मार्गदर्शन करणारे तीन पानी पत्र प्रत्येक मंत्र्यास पाठविले आहे. विशेषत: शेतकरी वर्गाच्या हितासाठी राज्य शासनाने जी पावले उचलली त्यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी या पत्रात केला आहे. जलयुक्त शिवार योजना, आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमधील उपाययोजनाची माहिती पत्रात देण्यात आली आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम राज्य शासन करीत आहे. शासनाचे हे निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण १५ आॅगस्ट रोजी जनतेला संबोधित करतानाच्या भाषणात त्यांचा उल्लेख करावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. बळीराजासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची प्रत्यक्ष पाहणी मंत्र्यांनी करावी आणि शेतकऱ्यांच्या भावना आपल्याला पत्राने कळवाव्यात असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. (विशेष प्रतिनिधी)