मुंबई : राज्यात मातंग समाजावर होणाऱ्या हल्ल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचा गंभीर आरोप लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वारसांनी केला आहे. अण्णाभाऊंची सून असलेल्या सावित्रीबाई साठे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांना कारवाईसाठी आॅगस्टपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर, राज्यभर प्रबोधन यात्रा काढत मातंग समाजाने भाजपाला आगामी निवडणुकांत मतदान न करण्याचे आवाहन करणार असल्याचे साठे यांनी सांगितले.
मातंग समाजावरील हल्ल्यांना मुख्यमंत्री जबाबदार-साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 05:00 IST