Join us
Daily Top 2Weekly Top 5

खारघर पोलीस ठाण्याचा फोन बंद

By admin | Updated: May 8, 2015 00:31 IST

खारघर पोलीस ठाण्याचा फोन गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने खारघरवासीय हैराण झाले आहेत. एखाद्या घटनेची तक्रार कशी करायची,

पनवेल : खारघर पोलीस ठाण्याचा फोन गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने खारघरवासीय हैराण झाले आहेत. एखाद्या घटनेची तक्रार कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोन दिवस होऊनही पोलिसांनी सेवा सुरू करून घेण्याची तसदी घेतलेली नाही.खारघर पोलीस ठाण्यात २७७४२५००, २७७४९००० हे दोन बीएसएनएल दूरध्वनी आहेत. मात्र ते दोन दिवसांपासून बंद आहेत. हैराण झालेल्या नागरिकांना एखादी तक्रार करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी खारघर पोलीस ठाणे गाठावे लागत आहे. गाव आणि आदिवासी पाडे मिळून खारघरमध्ये ४० सेक्टर्स आहेत. शहराची लोकसंख्यादेखील दोन लाखांच्या वर आहे. (प्रतिनिधी)