Join us  

विरोधकांच्या ‘गडा’त बंद; इतरत्र सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 1:54 AM

पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला.

मुंबई : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढीविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला मुंबईत संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणी आक्रमकता दिसून आली, तर काही ठिकाणी उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. मनसेने बेस्ट बसेसची तोडफोड करत रास्ता रोकोसह रेल व मेट्रो रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबईतील वाहतूक सुरळीत सुरू होती. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील स्थितीचा घेतलेला आढावा...काँग्रेस, राष्ट्रवादीची निदर्शनेराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर पश्चिम जिल्हा दिंडोशी तालुक्याच्या वतीने कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने केली. या वेळी उत्तर पश्चिम जिल्ह्यातील पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष अजित रावराणे यांनी दिली. तर अंधेरी पश्चिम येथे एस.व्ही. रोड व जे.पी. रोड येथील सर्व दुकाने व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या होत्या, अशी माहिती काँग्रेसचे माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी दिली.मनसे आंदोलकांनी रोखली मेट्रोबंदचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोला बसला. सकाळी ९.४५ च्या सुमारास १० ते १२ मनसेच्या आंदोलकांनी मेट्रोचे रीतसर तिकीट घेतले आणि मग आंदोलकांनी डीएननगर मेट्रो स्थानकात शिरून १५ मिनिटे मेट्रो रोखली. मुंबई मेट्रो वनच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. येथे पोलीसही आले आणि त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. या गोंधळामुळे सुमारे १५ ते २० मिनिटे मेट्रो रेल्वे सेवा ठप्प झाली. परिणामी इतर मेट्रो स्थानकात प्रवाशांची गर्दी उसळली. यामुळे मेट्रोला घाटकोपर ते वर्सोवा हे सुमारे २२ मिनिटांचे अंतर कापण्यास तब्बल १ तास लागला.पूर्व उपनगरांत संमिश्र प्रतिसादपूर्व उपनगरात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. चेंबूरमध्ये काँग्रेस आणि विक्रोळीत मनसेचा जोर असल्याने या दोन्ही भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र मुलुंड, भांडुप, गोवंडी, मानखुर्द, कांजूरमार्ग, नाहूर या भागात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ज्या भागात काँग्रेस आणि मनसेची ताकद आहे अशा चेंबूर आणि विक्रोळीमध्ये बंदचा जोर सोडला, तर इतर विभागांत परिस्थिती रोजच्यासारखीच होती.काही काळ रास्ता रोकोकाँग्रेसचे नेते माजी मंत्री चंद्र्रकांत हंडोरे आपल्या १०० कार्यकर्त्यांसह सकाळी अकरा वाजता बंदला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले. चेंबूर येथील स्वामी विवेकानंद चौकात त्यांनी सायन-पनवेल महामार्ग बंद करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी बाजूला करत रस्ता मोकळा केला. त्यानंतर त्यांनी चेंबूरच्या सांडू मार्गावरील दुकाने बंद केली. घाटकोपरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लाल बहाद्दूर शास्त्री मार्गवर रास्ता रोको करण्यात आला. मात्र, पोलिसांनी त्यांना बाजूला करत मार्ग मोकळा केला.पोलिसांनी रोखलेसकाळी गोवंडी स्थानकात घुसण्याचा प्रयत्न केलेल्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गोवंडी पोलीस ठाण्यात नेऊन सोडून दिले. त्यानंतर त्यांनी पुन्हा चेंबूर पांजरापोळ येथे जाऊन त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत सायन-पनवेल महामार्ग, तसेच मुंबईकडे जाणारा पूर्व मुक्त महामार्ग काही वेळ रोखून धरला. त्यामुळे पोलिसांनी नवाब मलिक यांना पुन्हा ताब्यात घेतले. १२ वाजेपर्यंत पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतल्यावर आंदोलन शांत झाले. विक्रोळी आणि मुलुंड रेल्वे स्थानकात मनसेचे कार्यकर्ते घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण पोलिसांनी त्यांना रेल्वे स्थानकात जाऊच दिले नाही.भाजपा नगरसेवकाच्या कार्यालयात तोडफोडगोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, खेरवाडी तसेच विलेपार्ले परिसरात हीच परिस्थिती होती. बंदला विरोध करणाऱ्या पी-उत्तर वॉर्डमधील दिंडोशी येथील प्रभाग क्रमांक ४३ चे भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा यांच्या मालाड पूर्व कुरार गावातील वायशेत पाड्यातील कार्यालयात तोडफोड करण्यात आली. दिंडोशीचे मनसे अध्यक्ष विजय व्होरा आणि मनसैनिकांनी या कार्यालयाची नासाधूस करत रोष व्यक्त केला. वर्सोवा विधानसभा क्षेत्रातील लोखंडवाला परिसरातील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न मनसैनिकांनी केला. त्या वेळी पोलिसांनी माजी विभाग संघटक संतोष सोनावणे, प्रदीप मुदाळकर, राकेश कागडा, राजू राठोड, शिवाजी कुडेकर, सुरेश पवार, राजा कागडा यांना ताब्यात घेतले.बैलगाडी हाकत आंदोलनगोरेगाव पश्चिम परिसरात मनसे मध्यवर्ती कार्यालय गुरुद्वाराशेजारी, एम.जी. रोडवर मनसेचे पूर्व पश्चिम परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र जमले होते. विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बंदला पाठिंबा देण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी बेस्ट बसच्या टायरची हवा काढली, तर जाधव यांनी बैलगाडी हाकत महागाईप्रति रोष व्यक्त केला.विविध पक्षांचा सहभागकेंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने बंदमध्ये सहभाग घेतला नव्हता. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शेकाप, मनसे व इतर पक्षांनी या बंदमध्ये सहभाग घेतला होता.शाळा-पालकांत संभ्रम‘भारत बंद’ला शहरातील शाळा, महाविद्यालयांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शहरात सर्व काही बंद राहील, या भीतीने पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे शहरातील काही शाळा सुरू राहिल्या असल्या, तरी शाळेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरही याचा परिणाम दिसून आला. बंद आंदोलनात मुंबईतील शाळा सहभागी होणार नाहीत, असे वाटत होते. प्रत्यक्षात मात्र अनेक खासगी शाळांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव शाळा बंद ठेवल्या. त्यासाठी शाळांनी आदल्या दिवशीच पालकांना त्यासंबधी मेसेजद्वारे सूचित केले होते. काही शाळांनी सकाळचे सत्र सुरू ठेवले, मात्र दुपारी आंदोलन चिघळतेय, असे वाटल्यावर दुसºया सत्रांना तत्काळ सुटी जाहीर केली.वेळापत्रक कोलमडलेयापूर्वीच पाऊस तसेच इतर कारणांमुळे आठ दिवस शाळा बंद राहिल्या आहेत. पुढचे काही दिवस गणेशोत्सवानिमित्त शाळांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडल्याचा दावा शिक्षकांकडून करण्यात आला.स्कूल बस सुरू; मात्र...स्कूल बस असोसिएशनने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला; मात्र काही ठिकाणी स्कूल बसला निशाणा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी दिली. तसेच पेट्रोल, डिझेल भाववाढीमुळे पुढील महिन्यापासून स्कूल बसचे शुल्क ७५ रुपयांनी वाढविल्याचे त्यांनी सांगितले.>गणेशोत्सवात ‘बंद’चा बाजारपेठांना फटका‘भारत बंद’मुळे दक्षिण मुंबईसह मध्य मुंबईतील दुकाने व बाजारपेठा बंद होत्या. या वेळी माल वाहतूक व रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, दुकाने बंद ठेवल्याने किरकोळ बाजाराचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाल्याची माहिती फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिली.शाह म्हणाले की, बहुतेक दुकाने सोमवारी बंद असतात. याशिवाय ‘बंद’मुळे किरकोळ दुकानदारांना ५० ते ६० टक्क्यांपर्यंत फटका बसला. याशिवाय भायखळ्यासह कॉटनग्रीन, काळाचौकी, लालबाग, परळ, दादरमधील दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली होती. काही ठिकाणी मनसे व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बंदचे आवाहन करत, दुकाने बंद ठेवण्यास भाग पाडले. कपड्याची मोठी उलाढाल होणारे हिंदमाता मार्केटही सोमवारी कडकडीत बंद होते.बंदमध्ये वाहतूकदार सामील झाले नसल्याची माहिती बॉम्बे गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मानद सरचिटणीस अनिल विजन यांनी दिली. विजन म्हणाले की, ‘भारत बंद’चा मुंबईतील माल वाहतुकीवर परिणाम झाला नाही. इंधनदरवाढीनिमित्त हे आंदोलन पुकारले असले, तरी यासंदर्भात माल वाहतूकदारांनी महिन्याभरापूर्वीच तीव्र आंदोलन केले होते. लवकरच इंधनावर आकारण्यात येणारा व्हॅट कमी करण्याची मागणी घेऊन, वाहतूकदारांचे शिष्टमंडळ अर्थमंत्र्यांना भेटणार आहे. त्यामुळे तूर्तास बंदमध्ये सामील न झाल्याचेही विजन यांनी स्पष्ट केले.>बाह्य रुग्ण सेवेवरकाहीसा परिणामशहर-उपनगरातील रुग्णालयांच्या रुग्णसेवेवरही भारत बंदचा परिणाम दिसून आला. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर परिणाम झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. दररोज पाच हजारांच्या जवळपास रुग्ण बाह्यरुग्णात येतात, मात्र त्यातुलनेत सोमवारी गर्दी कमी असल्याचे दिसून आले. मात्र जे.जे रुग्णालयाच्या बाह्यरुग्णसेवेवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितले. तर सेंट जॉर्ज रुग्णालयातही नेहमीप्रमाणे रुग्णांनी उपचारांसाठी हजेरी लावल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांनी सांगितले.>बेस्टवर दगडफेकबंदच्या काळात कायम लक्ष्य ठरणाºया बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांचे आजही मोठे नुकसान झाले आहे़ भारत बंदचे तीव्र पडसाद काही ठिकाणी उमटले़ आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत तब्बल १७ ठिकाणी बसगाड्यांच्या काचा फुटल्या तर एका ठिकाणी बसगाडीच्या टायरची हवा काढण्यात आली़बंदच्या काळातही प्रवाशांच्या

टॅग्स :भारत बंद