Join us
Daily Top 2Weekly Top 5

डांबरीकरणासाठी ‘सी-लिंक’ आज रात्री बंद

By admin | Updated: May 3, 2016 04:09 IST

वांद्रे- वरळी सी लिंकवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाकरिता ३ मे रोजी रात्री १० ते ४ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत

मुंबई : वांद्रे- वरळी सी लिंकवर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाकरिता ३ मे रोजी रात्री १० ते ४ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत वरळी ते वांद्रयाच्या दिशेकडील मार्ग बंद राहील. या काळात वाहन चालकांनी माहीम कॉजवे, दादर, प्रभादेवी या मार्गाचा वापर करावा, असे आवाहन एमएसआरडीसीतर्फे करण्यात आले आहे. सी लिंक वरील डांबरीकरणाच्या कामास २ मे रोजी रात्री १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)