मुंबई : मोबाइलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करणे जोगेश्वरीत राहणाऱ्या एका वकिलाला महागात पडले. बँकेतून बोलत असल्याचे सांगून ठगाने त्यांना बँक ॲप्लिकेशन अपडेट करण्यास सांगितले. त्यासोबत मोबाइलवर लिंक पाठवली. लिंक उघडताच त्यांच्या खात्यातून १ लाख ७८ हजार रुपये कमी झाल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अनोळखी लिंकवर क्लिक करणे पडले महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:15 IST