नागोठणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेंतर्गत आज विभागातील पिगोंडे ग्रामपंचायतीमधील आंबेघर गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे उद्घाटन सकाळी साडेआठ वाजता सरपंच नंदिनी बडे, उपसरपंच गंगाराम मिणमिणे, ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, राजेंद्र लवटे, सुधाकर पारंगे, शैला बडे, ज्योत्स्ना शेलार, प्रतिभा ताडकर, संजना ताडकर, ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे, बळीराम बडे, प्रदीप बडे, लक्ष्मण घासे, नाना बडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी चालू केलेल्या स्वच्छता मोहिमेचे कार्य अतुलनीय असून श्री सदस्य यासाठी झटून काम करीत आहेत. यातून प्रत्येक गाव स्वच्छ होत असून या मंडळींनी स्वच्छता मोहीम राबविण्याचा घेतलेला वसा हा कौतुकास्पद असाच आहे, तरी प्रत्येक नागरिकाने आपले गाव स्वच्छ कसे राहील, याकडे लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे उपसरपंच मिणमिणे यांनी सांगितले. (वार्ताहर)
आंबेघरमध्ये स्वच्छता मोहीम
By admin | Updated: January 18, 2015 22:57 IST