Join us

शहर स्वच्छतेसाठी ‘क्लिन केडीएमसी’ प्रणाली; अ‍ॅप्सच्या माध्यामातून तक्रार

By admin | Updated: January 1, 2015 23:27 IST

परिसरात कचरा साचल्यास त्याची थेट तक्रार आता अ‍ॅपस्च्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीकरांना करता येणार आहे.

कल्याण : परिसरात कचरा साचल्यास त्याची थेट तक्रार आता अ‍ॅपस्च्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीकरांना करता येणार आहे. या तक्रारीचे निवारण झाले की नाही याची माहीतीही तत्काळ मिळणार आहे. ही अद्ययावत मोबाईल प्रणाली ‘क्लिन केडीएमसी’ नावाने केडीएमसीने सुरू केली असून नववर्षाच्या सुरूवातीला महापौर कल्याणी पाटील आणि आयुक्त रामनाथ सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिचा शुभारंभ झाला. शहर स्वच्छतेसाठी अशी प्रणाली राबविणारी केडीएमसी राज्यातील पहिलीच महापालिका असल्याचा दावा केला जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचा एक भाग म्हणून केडीएमसीने या अद्ययावत प्रणालीची निर्मिती केली आहे. महापालिकेच्या संगणक विभागातर्फे हे मोबाईल अ‍ॅपस् तयार केले असून याचबरोबर ६६६.‘ेिू.ॅङ्म५.्रल्ल ही वेबसाईटही अद्ययावत केली आहे. क्लिन केडीएमसी हे अ‍ॅपस् गूगल प्ले स्टोर मधून नागरिकांना डाऊनलोड करता येणार आहे. यावर शहरातील कचऱ्याचे, साचलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांचे, रस्त्यावर पडलेले भंगार यांचे फोटो नाव, मोबाईल क्रमांक आणि इमेलसह पाठवावेत, असे आवाहन आयुक्त सोनवणे यांनी केले आहे. संबंधित विभागाचे अधिकारी तत्काळ या तक्रारीवर कारवाई करून त्याचा फोटो संबधित तक्रारदाराला पाठवतील. याकरीता अधिकारी वर्गासाठी एटीआर अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट नावाचे दुसरा अ‍ॅपस् तयार केल्याचे सोनवणे यांनी सांगितले.