Join us  

कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांना क्लीनचिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:45 AM

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : एसीबी न्यायालयाचा निर्वाळा

मुंबई : काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्यापाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांनाही विशेष एसीबी (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) न्यायालयाने मंगळवारी दोषमुक्त केले़ कृपाशंकर सिंह यांच्या पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्रमोहन, सून अंकिता, मुलगी सुनीता व जावई विजय सिंह या सर्वांना एसीबी न्यायालयाने बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून दोषमुक्त केले़सिंह व त्यांच्या कुटुंबीयांकडे बेहिशेबी मालमत्ता आहे़ याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती़ याची दखल घेत न्यायालयाने एसीबी व आर्थिक गुन्हे प्रतिबंधक विभागाला (ईओडब्ल्यू) दिले होते़ या दोन्ही विभागांनी केलेल्या चौकशीत सिंह व त्यांच्या कुटुंबीयांकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले़ एसीबीने याचे आरोपपत्रही दाखल केले़ सिंह हे माजी मंत्री असल्याने त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी आवश्यक होती़ एसीबीने खटला चालवण्यासाठी राज्यपालांकडे मागितलेली परवानगी त्यांनी नाकारली़ परिणामी सिंह यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.त्यानंतर सिंह यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणातून दोषमुक्त करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला़ या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही, आम्ही कोणीही मंत्री अथवा सरकारी नोकर नव्हतो़ या प्रकरणात सिंह हे प्रमुख आरोपी होते़ त्यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. आम्हालाही यातून दोषमुक्त करावे, अशी मागणी सिंह यांच्या कुटुंबीयांनी अर्जात केली़ हा अर्ज ग्राह्य धरत न्यायालयाने सिंह यांच्या कुटुंबीयांना दोषमुक्त केले़राज्यपालांनी परवानगी नाकारलीसिंह हे माजी मंत्री असल्याने त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांची परवानगी आवश्यक होती़ एसीबीने खटला चालवण्यासाठी राज्यपालांकडे मागितलेली परवानगी त्यांनी नाकारली़ परिणामी सिंह यांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे.

टॅग्स :कृपाशंकर सिंगकाँग्रेस